स्त्री सहनशीलतेची
साक्षात मुर्ती आहे
स्त्री सामर्थ्याची
विश्वात कीर्ती आहे।1।
या जीवनाची स्त्री
एक मालिका आहे
सुगंधीत करणार जीवन
स्त्री कालिका आहे ।2।
पुरुषांच्या बाहुत भरणार
स्त्री बल आहे
स्वतः उमलून दुसऱ्यांना
सुगंध देणारं फुल आहे।3।
स्त्री मुळे जग टिकून आहे
याची जगाला आठवण आहे
स्त्री महात्म किती
या इतिहासात साठवण आहे।4।
कवि
अभय सर
यह भी जरूर पढ़े…..
|
|