The super power for India : महासत्ता भारतासाठी (india superpower)

The super power for India : महासत्ता भारतासाठी (superpower in making india), super power countries india, super power countries india rank. 

The super power for India : महासत्ता भारतासाठी (superpower in making india)

 

भारत महासत्ता होईल

असा सूर आहे

अंधश्रद्धा, भ्रष्टाचार

यांचाच पूर आहे।1।

उच्च नीच, गरीब श्रीमंत

यांच्यात तंटा आहे

ही भारतासाठी

धोक्याची घंटा आहे।2।

महासत्ता होण्यासाठी

समता सर्वांना हवी आहे

असमानतेची कपट नीती

का ? देशाला नवी आहे ।3।

नेते असे फक्त छाप

हजार आहेत

अन्याय अत्याचार भ्रष्टा चे

येते बाजार आहेत।4।

आमदार खासदारचे पगारवाढ

धानाला भाव का नाही ?

श्रमिक राबतो रात्रंदिन

श्रमाला त्याच्या वाव का नाही |5|

दुरबळांचे शोषण करणे

हा सरकार चा छंद आहे

म्हणून भारतात महासतेची

गती मंद आहे।6।

शोषित अन्याय ग्रस्तांना

सामाजिक, राजकीय परिवर्तन पाहिजे

विचार तसे आचार

असे वर्तन पाहिजे।7।

महासत्ता भारता साठी

एवढं मात्र करा

समता, स्वतंत्र, बंधुता न्यायाने

भारताला पात्र करा।8।

कवि : अभय

यह भी जरूर पढ़े….

Leave a Reply

error: Content is protected !!