दुष्काळ व पाणी टंचाई ची
जोरदार चर्चा आहे
पिण्याच्या पाण्यासाठी
जागोजागी मोर्चा आहे।1।
पिण्याच्या पाण्यासाठी
चटके बसत आहेत
पाण्याचा हक्का साठी
फटके बसत आहेत ।2।
पाणी टंचाई दूर करू
फुकटचे सल्ले आहेत
एक थेंब पाण्यासाठी
जिवावर हल्ले आहेत।3।
कायमस्वरूपी ही भीषण
पाणी टंचाई आहे
मिनरल वॉटर पाणी पाऊच
यांची लढाई आहे।4।
एक थेंब पाण्यासाठी
लढण्याची वेळ येईल
एक थेंब पाणीच
जीवाचा काळ होईल।5।
मुबलक पाणी असून
का पाण्याचा तुटवडा आहे
मिनरलवॉटर पाणीपाऊच चा
का पुरवठा आहे।6।
पाणी वापरू योग्य
येणार नाही पाणी टंचाई दिन
पाण्याच्यारक्षणासाठी साजरा
करू जलसंधारण दिन।7।
कवि
अभय सर
यह भी जरूर पढ़े…..