पवित्र भारत भुमित
भाडखाऊ नेत्यांचे रात्रदिन चाळे
शुभ्र वस्र खिशे खाली
भ्रष्टाचारीचे देशभक्त घोटाळे ।।1।।
पानी नाही वीज नाही
शेतकरी घेतो गळफास
पिज्जा डोसा नेता खाई
जनतेला नाही घास ।।2।।
प्रचारात जोरदार भाषण
संगे बाई अन बाटली
मतदाराना मूर्ख बनवूनी
रोख रक्कम आपापसात वाटली ।।3।।
मानवी वस्तीत लोडशेडिंग
वीज देऊनी भांडवलदाराला
अंधार दूर करण्यासाठी
मेनबत्ती नाही घरादाराला ।।4।।
चोर नेत्यांच्या नेतृत्वाविषयी
मतदारांच्या मनात आहे शंका
मीडियाला हाताशी धरूनी
फोल विकासाचा वाजविती डंका
जनता सरकारची तिजोरी लूटने
हेच त्यांचे ध्येय
जनतेला जागृत करण्या
ते का करतील व्यय ।।6।।
शिक्षणावर खर्च नाही
शिक्षण आयोग लुटले
निरपराधाला शिक्षा अन
चोर गुन्हेगार सुटले ।।7।।
हाच त्यांचा प्रकाश आणि विकास
शब्द होतील शस्त्र
भाडखाऊ नेत्यांचे एक दिवस
मतदार उतरवतील वस्त्र ।।8।।
कवि
अभय सर
यह भी जरूर पढ़े…..
|
|