आई खरंच काय आहे?
सुमधुर वाणी आहे
मायेची गाणी आहे
तहानलेल्या चा पाणी आहे
कर्ण सम दाणी आहे
दुधाची लोणी आहे
ममतेची कहाणी आहे।1।
जगाची शान आहे
प्रेमाची खाण आहे
सर्वांचा मान आहे
सुमधुर गाणं आहे
सर्वांची जाण आहे
ममतेचा पान आहे।2।
धना पेक्षा धन आहे
सोन्याहून सोन आहे
प्रेमाहून प्रेम आहे
मरणारांचा प्राण आहे
संकटात ठाम आहे।3।
प्रेमाची कदर आहे
मायेचा पदर आहे
सुखाची सावली आहे
सर्वांची माऊली आहे
दुःखात धावली आहे
सर्वाना पावली आहे।4।
समुद्राची लाट आहे
झोपलेल्यांची खाट आहे
श्रीमंतीचा थाट आहे
पाण्याचा माठ आहे
नदीचा काठ आहे
भटकलेल्यांची वाट आहे ।5।
अंधारात ज्योत आहे
दिव्याची वात आहे
संकटात साथ आहे
अपंगाचा हात आहे
वाहणारा पाट आहे
जेवणाचा ताट आहे।6।
घावावरील मलम आहे
शिकणाऱ्याची कलम आहे
अंधारात प्रकाश आहे
सर्वांचा विकास आहे।7।
कवि
अभय सर
यह भी जरूर पढ़े…..
|
|