अभंग जीवनाचे | Life of Abhanga

 अभंग जीवनाचे  | Life of Abhanga

करुनी अभ्यास सकल। 

वाढवावी अक्कल।

नाही नक्कल।

या जीवनी ।।1।।


जिथे मिळाली सवड।

पूर्ण करावी आवड।

सनमार्गाला नको नावड।

करावी मानवानी ।।2।।


देह नाशीवंत।

श्वासाने जिवंत।

व्हाव्हे कीर्तिवंत।

सर्वानी ।।3।।


वेळोवेळी सावधान।

मानावे समान।

मोठ्यांचा सन्मान।

करावा थोरांनी ।।4।।


जीवनाची जड़नघड़न।

जीवनात जन्म मरण।

चांगल्याला शरण।

जावे जीवंतपनी ।।5।।


नको अहंकार।

नको चमत्कार।

करा सत्कार।

चांगल्यांचा ।।6।।


नको भ्रम।

नको वाईट काम।

असावे नम्र।

सकळ जणांनी ।।7।।

अभंग रचनाकार

अभय

यह भी जरूर पढ़े…..  


 ★ प्यारा सा भारत मेरा 

★ हे रत्न भारताचे  

★ अन्धविश्वास 

★ बाबांची शान रमाई  

★ मतदानातून दाखवून देऊ 


★ बालमजुर 

★ देश कुठे होता ?

★ पाण्याची टंचाई 

★ सर्वांनी झटले पाहिजे 

★ स्विस बँकेतील काळा पैसा 

Leave a Reply

error: Content is protected !!