फॅशन आणि प्रतिष्ठा | Fashion and prestige

फॅशन आणि प्रतिष्ठा | Fashion and prestige

मीटरचे कपडे 

सेंटीमीटर मध्ये आले

जे नाही व्हायचे 

तेच होऊन गेले।1।

फॅशन आणि प्रतिष्ठासाठी

उरलीच नाही लाज 

मॉडेल दिसायला 

भले भले साज।2।

नाईट लाईफ ,रेव्ह पार्टी

जागोजागी भरते 

हीच अब्रू जायला 

कारणीभूत ठरते।3। 

फॅशन च्या नांवावर

मर्यादा ओलांडती

अनेक घर कुटूंब 

इथे वाया जाती।4।

अर्धनग्न संस्कृती

ही आपली नाही

भारतीय संस्कृती

देईल याची ग्वाही।5।

श्रीमंतीचा, प्रतिष्ठाचा

हा हाव भाव नको

पवित्र भारत भूमीत

अंगप्रदर्शनाचा गाव नको।6।

फॅशनचे वेड सोडा 

नाहीतर जीवन होईल वाया

पुन्हा एकदा रोगराईच्या 

तुम्ही पडाल पाया।7।

संस्कृतीला शोभेल

असेच वागणे परिधान करा

कवी अभय चा संदेश

भारत भूमीचा मान करा।8।

कवि 

अभय सर  

यह भी जरूर पढ़े…..  


 ★ प्यारा सा भारत मेरा 

★ हे रत्न भारताचे  

★ अन्धविश्वास 

★ बाबांची शान रमाई  

★ मतदानातून दाखवून देऊ 

★ सर्वाणि झटले पाहिजे 

★ देशभक्त घोटाळे

★ बालमजुर 

★ देश कुठे होता ?

★ पाण्याची टंचाई 

★ सर्वांनी झटले पाहिजे 

★ स्विस बँकेतील काळा पैसा 

★ स्त्री सामर्थ्य 

★ अभंग जीवनाचे 

Leave a Reply

error: Content is protected !!