नागाची नाग भूमि
भिमान केली पवित्र
अदभुत दीक्षा भूमि
शांति देई सर्वत्र।1।
माणसाने माणसाशी मानुसकी ने
वागन्याचा मिळे संदेश
शांति, शील, करुणेचा
तथागता चा उपदेश।2।
बाबा च्या संदेशा साठी
देश विदेशातुन लोक आले
पाहुनी दीक्षा भूमि ला
आनंदित झाले।3।
नागाची नाग भूमि
भिमाच्या श्रमान गाजतय
धरनीपासून आकाशापर्यन्त
जय भीम चा नारा वाजतय।4।
क्रांति भूमि दिक्षा भूमि
सर्वाना सम समान
भीम बुद्धा च्या तत्वा मुळे
मानव होई महान।5।
मिळे दिक्षा भूमिवर
शीदोरी ध्यानाची
अशांति दूर होउनि
शांति मिळे मनाची।6।
सुद्ध झाले भिमामुळे
नाग नदी चे पाणी
बुद्ध झाले स्वकर्तुत्वा ने
सम्मेक संबुद्ध ध्यानी।7
दीक्षाभूमिचे बघुनी चित्र
आसमान सारा लाजतय
स्वतंत्र समता बंधुताने
दीक्षाभूमि जगभर गाजतय।8।
दीक्षा भूमिची महिमा
जगात आहे न्यारी
नागाची नाग नगरी
सर्वाना आहे प्यारी।9।
बुद्धम सरणं च्या गजरात
भीम बुद्धचा उस्तव होतो
मनापासुनि स्री पुरुष
भीम बुद्धाला सरण येतो।10।
मानव मानव समान
दीक्षाभूमि वर पाहत असतो
बुद्ध ध्यानाने मानव
करुणामय होत असतो।11।
दुःखा चे संकट
क्षणात दूर होत असते
सजलेल्या नाग नगरित
मानवाचे स्वागत होते।12।
दीक्षाभूमि चा आनंद
सदैव राहु दे
स्वतंत्रता, समता बंधुता
जगात पाहू दे।13।
कवि
अभय सर
यह भी जरूर पढ़े….
|
|