स्विस बँकेतील काळा पैसा | Black money in Swiss bank

स्विस बँकेतील काळा पैसा | Black money in Swiss bank

काळ्या पैशाच्या विचाराने

लोक बेजार आहेत

कुणी स्वत: चोर तर

कुणी बंडखोर आहे।1।

काळ्या पैशाची चर्चा 

नाही घराघरात आहे

तर साऱ्या विश्वात 

जगभरात आहे।2।

काळा पैसा भारतात येईल 

भ्रमात या जो तो रमला आहे

स्वीस बँकेतील काळा पैसा

नेत्यांचा जुमला आहे।3।


काळा पैसा भारतात येईल

हा लोकांचा होरा आहे

एकमेकांना बोट दाखवणे

हा नेत्यांचा तोरा आहे।4।


देशाचे काहीही होवो 

जो तो स्वतःला तारून आहे

पैशाच्या वाहत्या गंगेत 

डुबकी मारून आहे।5।


देश विकाशा करीता

कोणी उठला पाहिजे

मतदारांना मताधिकाराचा

अधिकार पटला पाहिजे।6।


भ्रष्टाचार निर्मुलन साठी

पवित्र दिल पाहिजे

का मग विनाकारण

लोकपाल बिल पाहिजे ?।7।


उद्देश नाही दिशा नाही

जो तो आपसात भांडत आहे

भ्रम संभ्रम निर्माण करुन

वर्तमान कांडत आहे।8।

कवि 

अभय सर 

यह भी जरूर पढ़े…..  


 ★ प्यारा सा भारत मेरा 

★ हे रत्न भारताचे  

★ अन्धविश्वास 

★ बाबांची शान रमाई  

★ मतदानातून दाखवून देऊ 


★ बालमजुर 

★ देश कुठे होता ?

★ पाण्याची टंचाई 

★ सर्वांनी झटले पाहिजे 

★ स्विस बँकेतील काळा पैसा 

Leave a Reply

error: Content is protected !!